राज्य विक्रीकर विभागाचे लाचखोर साहाय्यक राज्यकर आयुक्त कह्यात !
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !
गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे (वय ५२ वर्षे) यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये कोंभळी (ता. कर्जत) येथे संगनमताने खाटे दस्तऐवज सिद्ध करून ९ सहस्र ३२० रुपयांचा, तर चांदे खुर्द येथे ५८ सहस्र २४८ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे नोंद केले आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेतील कर विभागात कार्यरत असलेल्या एका प्रभारी कर निरीक्षकासह २ लिपिकांना ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
छोट्या छोट्या कामांसाठीही पैसे मागणारे अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत. तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी कुणी लाच मागितल्यास लाच देऊ नका, लगेचच तक्रार करा !
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज घेतल्याचा घोटाळा वर्ष २०२१ मध्ये झाला होता. यात बँकेच्या वतीने मुख्य ७१ शेतकऱ्यांना आरोपी करत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता सूचीमध्ये समावेश करून प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठवण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामचंद्र रोटेवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
वाळूचा ट्रक नियमित चालू देण्यासाठी, तसेच त्यावर कारवाई न करण्यासाठी १ लाख ८० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना तहसीलदारांचा खासगी दलाल रमेश गुंडेराव मोगरगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
गोठवलेले बँक (अधिकोषातील) खाते पुन्हा चालू करून ‘क्लिअरन्स’ प्रमाणपत्र देण्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील निरीक्षकाला सापळा रचून पकडले.
भ्रष्टाचाराने बरबटलेली ही यंत्रणा सुधारण्यासाठी गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे ! लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल अशी शिक्षा त्यांना केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !