निलंगाचे (जिल्हा लातूर) तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या कह्यात !

वाळूचे ट्रक चालू देण्यासाठी केली होती प्रतिमास ६० सहस्र रुपयांची मागणी

लातूर – वाळूचा ट्रक नियमित चालू देण्यासाठी, तसेच त्यावर कारवाई न करण्यासाठी १ लाख ८० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना तहसीलदारांचा खासगी दलाल रमेश गुंडेराव मोगरगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी निलंगा तालुक्याचे तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

निलंगा तालुक्यात वाळूचे ३ ट्रक चालू देण्यासाठी प्रतिमास ६० सहस्र रुपयांची मागणी करण्यात आली होती. मागील ३ मासांची रक्कम मिळून १ लाख ८० सहस्र रुपये मागितले असता तडजोडीत १ लाख ५० सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले. ही रक्कम तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव यांच्या घरासमोर त्यांच्या दलालाने स्वीकारली. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण उपअधीक्षक पंडित रेजीतवाड हे करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र !