३ सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी तक्रार नोंद होताच तुळसुली तर्फ माणगावचे तलाठी पसार

सहस्रो रुपयांचे वेतन आणि अन्य भत्ते असतांना जनतेकडून लाच मागणार्‍यांवर आतापर्यंत कठोर कारवाई न झाल्याने देश भ्रष्टाचाराने ग्रस्त झाला आहे. असे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यास अटक !

सेवानिवृत्तीनंतर शासकीय निवासस्थान सोडतांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक मनोज नरवडे यांना १ जून या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांना अटक !

सरकारने अशांना केवळ अटक करून थांबू नये, तर त्यांची सर्व संपत्तीही जप्त केली पाहिजे !

मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महावितरण’चा लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !

अशा लाचखोरांना कठोर शिक्षा झाल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

लाच घेतांना प्रदूषण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक !

एका उद्योजकाकडून ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ चिकोडीचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार शंडुरी आणि विभागीय साहाय्यक अधिकारी प्रदीप ममदापूर या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

लोणावळा (पुणे) येथे पोलीस निरीक्षकासह दोघांवर लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

लाचखोरी करणारे पोलीस कधी कायदा-सुव्यवस्था राखू शकतील का ?

भिवंडी येथील शासकीय अनुदानित शाळेत प्रवेशासाठी ३ सहस्र ५०० रुपयांची मागणी !

भिवंडी येथील एका शासकीय अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ३ सहस्र ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

१२ वर्षांत १२ सहस्र ५९० (प्रत्येक दिवशी ३) लाचखोरीची प्रकरणे उघड !

देयकासाठी ५० लाखांची लाच घेणाऱ्या जलसंधारण विभागातील ३ अधिकाऱ्यांना अटक !

प्रतिमास ५० सहस्र ते लाखो रुपयांचे वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही असे अधिकारी लाच घेत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना बडतर्फच करायला हवे. तसेच त्यांनी अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती जप्त करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !

मूल्यवर्धित कर विभागातील अधीक्षक आणि निरीक्षक यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक !

मूल्यवर्धित कर विभागातील (जी.एस्.टी.) अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.