कोल्हापूर येथील आरोग्य सेवा मंडळाच्या महिला अधिकार्यांना अटक !
कोल्हापूर येथील आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे.
कोल्हापूर येथील आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलीस खात्याला कलंक ठरणार्या लाचखोर पोलिसांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
शेतभूमीच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागण्यासाठी निलंबित पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. तिवडे हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
भ्रष्टाचारग्रस्त पोलीस दल ! सरकारने या कृत्यात सहभागी दोषी पोलिसांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छी-थू’ होईल, असे केले पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !
अकोट तालुक्यातील ग्राम जऊळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाचे देयक अदा करण्यासाठी ग्राम जऊळखेड येथील सरपंच महिलेचा पती आशिष निपाणे आणि ग्रामसेवक उत्तम तेलगोटे यांनी शासकीय कंत्राटदाराकडे ४६ सहस्र रुपयांची लाच मागितली.
नवीन पाण्याच्या जोडणीसाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र बळवंत हुजरे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
हडपसर पोलीस ठाण्यामध्ये उत्तरप्रदेशातील गोमतीनगर येथील ३२ वर्षीय व्यावसायिकाने २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदाराला त्यांचे २० लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी ठाण्यातील सागर पोमन यांनी त्यांच्याकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली
तालुक्यातील पाटखळ येथील ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख यांना ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पूर्ण केलेल्या कामाचे देयक संमत करण्यासाठी ग्रामसेवक दीपक देशमुख यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली.
अंगणवाडीच्या कामाचे अंदाजपत्रक मान्य करून घेण्यासाठी अडीच सहस्र रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ अधिकार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले.
सोनोग्राफी केंद्राचा परवाना नूतनीकरण करण्यासाठीची सर्व कागदपत्रे संबंधित रुग्णालयाकडे दिली होती. तरीही आधुनिक वैद्य कनकवळे, गिरी आणि कडाळे यांनी संगनमत करून संबंधित व्यक्तीकडे ४० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले होते.