लाच मागणारा निलंबित पोलीस नाईक जॉन तिवडे याला अटक !

कोल्हापूर, १० ऑगस्ट (वार्ता.) – शेतजमिनीच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागण्यासाठी १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निलंबित पोलीस नाईक जॉन तिवडे याला १० ऑगस्ट या दिवशी कुपवाड पोलिसांनी अटक केली. तिवडे याच्यावर सप्टेंबर २०२० मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी तो निलंबित होता. यानंतर गेल्याच आठवड्यात त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

संपादकीय भूमिका

पोलीस खात्याला कलंक ठरणार्‍या लाचखोर पोलिसांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !