महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे २ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात !

पुणे – अंगणवाडीच्या कामाचे अंदाजपत्रक मान्य करून घेण्यासाठी अडीच सहस्र रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले. प्राधिकरणाच्या लष्कर परिसरातील कार्यालयात ही कारवाई केली. किरण शेटे (वय ३१ वर्षे) आणि परमेश्वर होळकर (वय ४९ वर्षे) अशी कह्यात घेतलेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत. शेटे हे उपअभियंता या पदावर कार्यरत आहेत, तर हेळकर हे शाखा अभियंता आहेत. शिवेगाव येथील अंगणवाडीत इलेक्ट्रिक कामे आणि पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी या दोघांनी ठेकेदाराकडे प्रत्येकी अडीच सहस्र रुपयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली असता पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे आणि उपअधीक्षक श्रीहरि पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात सापळा रचून दोघांना कह्यात घेतले. पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर या प्रकरणी पुढील अन्वेषण करत आहेत.