कोल्हापूर येथील आरोग्य सेवा मंडळाच्या महिला अधिकार्‍यांना अटक !

कोल्हापूर – येथील आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. तक्रारदार व्यक्तीने त्याचे भविष्य निर्वाह निधीतील ६ लाख ७२ सहस्र रुपये संमत करण्यासाठी विनंती केली होती; मात्र त्यासाठी महिला अधिकारी भावना शिंदे यांनी रकमेच्या १० टक्के प्रमाणे लाच मागितली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ ऑगस्ट या दिवशी महिला अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. (भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! – संपादक)