उल्‍हासनगर महापालिकेच्‍या २ लाचखोर मुकादमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक !

ठाणे, ६ जानेवारी (वार्ता.) – तक्रारदार रहात असलेल्‍या ठिकाणी त्‍यांच्‍या नातेवाइकांच्‍या घराच्‍या दुरुस्‍तीचे काम चालू होते. हे काम चालू असतांना यात कोणतीही अडचण येऊ नये, तसेच हे काम अविरत चालू रहाण्‍यासाठी उल्‍हासनगर महानगरपालिकेच्‍या प्रभाग समिती क्रमांक ३ मधील वसंत कृष्‍णा फुलोरे आणि बाजीराव दामोदर बनकर या मुकादमांनी ५ सहस्र रुपयांच्‍या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ठरलेली ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्‍यांची सर्व संपत्ती जप्‍त करायला हवी. – संपादक)