- असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखू शकतील का ?
- अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !
पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी पोलीस ठाण्यात प्रविष्ट असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी रोहित डोळस या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. तक्रार अर्जावरून तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी, तसेच प्राप्त झालेला अर्ज हा दिवाणी म्हणून नोंद करण्यासाठी डोळस यांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. तक्रारीची पडताळणी केली असता डोळस हे लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला.