नाशिक येथे भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षकांना ५० सहस्रांची लाच घेतांना अटक !

नाशिक – येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले जिल्‍हा अधीक्षक महेशकुमार शिंदे आणि लिपीक अमोल शिंदे यांना तक्रारदाराकडून ५० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. भूमी मोजणीमध्‍ये क्षेत्र कायम करण्‍यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच मागितली होती; मात्र तडजोडीअंती ५० सहस्र रुपये द्यायचे ठरले होते.