वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५५ प्रसंगांत सापळे लावून १ सहस्र ६४ लाचखोरांना अटक केली होती; पण वर्ष २०२२ मध्ये सापळे आणि लाचखोर या दोन्हींची संख्या न्यून झाली आहे. आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७२३ सापळे लावून १ सहस्र २४ लाचखोरांना पकडले, तर बेहिशेबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे यांत ५९ आरोपींना पकडण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

लाचखोरी समूळ नष्ट होईपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक !