वन विभागाचा ठाणे येथील लाचखोर वन परिमंडळ अधिकारी कह्यात !

ठाणे, १ फेब्रुवारी (वार्ता.) – येऊरच्‍या जंगलातील टेकडीवर मुरूम-माती वाहून नेण्‍यासाठी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी विकास कदम यांनी तक्रारदाराकडे ६ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कदम यांना कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्‍यांची सर्व संपत्ती जप्‍त करायला हवी. – संपादक) मागील काही वर्षांपासून येऊरच्‍या जंगलात मोठ्या प्रमाणात अवैधपणे बांधकामे करण्‍यात येत आहेत. (अशा अवैध बांधकामांना आवर कोण घालणार ? – संपादक)