पंडित संजय गरुड (गायन) यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट !

भुकूम, पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करत असतांना भुकूम गावात श्री. दिनेश माझीरे आणि त्यांचे मित्र डॉक्टर पंडित संजय गरुड यांचा संपर्क झाला. सर्वजण हिंदु जनजागृती समितीचे कार्य ऐकूण प्रभावित झाले

समर्पण भक्तीसुधा फाऊंडेशन’ आणि ‘समर्थ व्यासपीठ’ यांच्या वतीने उपक्रम !

प्रत्येक वर्षी श्रीराम मंदिराच्या वर्धापनदिनी हा उपक्रम आयोजित केला जाणार असल्याचे ‘फाऊंडेशन’चे अध्यक्ष आशिष केसकर यांनी सांगितले.

हिंदुत्व, धर्म, अध्यात्म, क्रांतीकारक आणि राष्ट्र यांवर प्रखर झंझावाती भाष्य करणारे व्याख्याते डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे !

आजपासून ४४ वर्षांपूर्वी क्रांतीकारकांविषयी बोलणे, हे धक्कादायक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलणे दूरच, त्यांच्याविषयी ऐकणार्‍यांनाही भीती वाटत असे, एवढी भीती त्या वेळी समाजात होती.

भक्तीसत्संगाच्या माध्यमातून रामजन्माचा आनंद अनुभवणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता जोशी !

‘श्रीरामच कृष्णरूपात अवतीर्ण झाला असून तोच ‘जयंत’रूपात साधकांना आनंदाची अनुभूती देत आहे’, असे मला अनुभवता आले.

महादेवाची होळी !

गुलाल आणि रंग यांविरहित अशी शिवाची होळी आहे. महादेवाने मनकर्णिका घाटावर (स्मशान घाटावर) भूत आणि प्रेत यांच्या समवेत होळी खेळली.

‘देवी होमा’मध्ये महर्षींनी प्रतिदिन साधकांना ‘श्री हंसवाहिनीदेवी’चे स्मरण करण्यास आणि संगीत विभागातील साधकांना यागाच्या वेळी संगीत सेवा प्रस्तुत करण्यास सांगण्यामागील शास्त्र !

पहिल्या उत्तरात ‘श्री सरस्वतीदेवीची उपासना समष्टीकडून अल्प प्रमाणात केली जाणे’ आणि दुसर्‍या उत्तरात ‘काळ आलेला नसल्याने श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व प्रगट न होणे’, ही २ कारणे माझ्या लक्षात आली.

सनातनच्या १०० व्या संत पू. (श्रीमती) सीताबाई श्रीधर जोशी (वय ९९ वर्षे) आणि त्यांचे कुटुंबीय यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सत्संगात झालेला भक्तीपूर्ण संवाद !

‘मी संसार केला नाही’, असे नाही. मला ६ मुली आणि १ मुलगा अशी ७ मुले आहेत; परंतु त्या संसारात माझे मन रमत नव्हते. माझे मन सतत भगवंतामध्येच रमत होते. त्यामुळे माझ्या यजमानांनी मला सांगितले, ‘‘तू तुझा मार्ग पकडून पुढे जा. मी माझ्या पद्धतीने रहातो.’’ नंतर कितीही अडथळे आले, तरी मी कीर्तने आणि प्रवचने ऐकण्यासाठी जाऊ लागले.

सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३८ वर्षे) यांची तत्त्वनिष्ठता आणि आध्यात्मिक प्रगल्भता अन् साधकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सौ. प्रियांकाने मला सांगितले, ‘‘बाबा, अशा प्रसंगात अडकू नये. काळानुसार व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधनेला अधिक महत्त्व आहे. साधनेच्या दृष्टीने असे करणे अयोग्य आहे.’’ तिने मला हे भावनारहित आणि तत्त्वनिष्ठ होऊन स्पष्टपणे सांगितले. सौ. प्रियांकाचा साधनेच्या दृष्टीने हा विचार उच्च आहे.

तळमळीने आणि भावपूर्ण व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या पणजी (गोवा) येथील सौ. सुगंधा रोहिदास कांबळी (वय ६९ वर्षे) !

सौ. सुगंधा कांबळी या २७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांनी विविध सेवा तळमळीने आणि भावपूर्ण केल्या आहेत. आता त्यांना वयोमानानुसार शारीरिक अडचणी आहेत, तरीही त्यांच्यामधील सेवेविषयीची तळमळ आणि आध्यात्मिक भाव प्रतिदिन वृद्धींगत होत आहे

निर्जीव वस्तूंप्रती भाव असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १८ वर्षे) !

‘त्याग’ हा शब्द उच्चारल्यावर ‘मोठ्या वस्तूंचा त्याग करणे’, असे मला वाटते.’ प्रत्यक्षात त्याग हा लहान गोष्टींमध्येही होऊ शकतो. एखाद्या प्रसंगात स्वतःच्या इच्छेप्रमाणे होत नसल्यास निराश न होता ‘या प्रसंगात ईश्वराची इच्छा काय आहे ?’, असा विचार करून ईश्वरेच्छेने वागल्यामुळे स्वेच्छेचा त्याग होणार आहे.