महादेवाची होळी !

‘वृंदावन येथे गोप-गोपींनी होळी खेळली’, हे सर्वांना ठाऊक आहे. ‘वैरागी शिवानेही होळी खेळली’, याविषयी मला ठाऊक नव्हते. उत्तर भारतात ‘खेलैं मसाने में होरी’ असे शिव होळी खेळतांनाचे वर्णन करणारे एक सुंदर गाणे आहे. मी हे गाणे ऐकतांना माझ्या डोळ्यांसमोर ते दृश्य येते. त्यातील काही ओळी पुढे दिल्या आहेत.

शिवाची होळी

१. गीतातील शिव होळी खेळतांनाचे वर्णन

भूतनाथ की मंगल होरी देखि सिहाएं बिरिज की छोरी ।
धन धन नाथ अघोरी
दिगंबर खेलैं मसाने में होरी ।।

कु. स्मितल भुजले

२. चित्रातील लिखाण

अ. महादेव कि होली, गंगाघाट, बनारस

आ. लखि सुंदर फागुनी छटा के,
मन से रंग-गुलाल हटा के ।
चिता भस्म भरी झोली,
दिगंबर, खेले मसाने में होरी,
भूत पिशाच बटोरी दिगंबर, खेले मसाने में होरी ।।

३. शिवाने खेळलेली होळी

गुलाल आणि रंग यांविरहित अशी शिवाची होळी आहे. महादेवाने मनकर्णिका घाटावर (स्मशान घाटावर) भूत आणि प्रेत यांच्या समवेत होळी खेळली. ज्यांच्या झोळीत भस्म आहे आणि ज्याची ते सर्वांवर उधळण करतात, अशी ही भूतनाथांची मंगलमय होळी बघून वृंदावनवासी गोपी म्हणतात ‘धन्य धन्य नाथ आणि अघोरी !’

स्मशानातही आनंद देऊन सर्वांची भीती दूर करणार्‍या महादेवाच्या चरणी कोटीशः प्रणाम !’

– कु. स्मितल भुजले, फोंडा, गोवा. (२३.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक