
‘मी प्रतिदिन सकाळी ६.४५ वाजता श्रीकृष्णाला नमन करतो. एकदा माझे ध्यान लागले असतांना ‘श्रीकृष्णाने मला त्याच्यासाठी बासरी आणायला सांगितले.’ त्याच्या सांगण्यावरून मी त्याच दिवशी दुकानातून बासरी आणली. त्यासंदर्भात मी माझी मुलगी सौ. प्रियांका राजहंस हिला सांगितले.

१. मुलीने वडिलांना दिलेला दृष्टीकोन !
सौ. प्रियांकाने मला सांगितले, ‘‘बाबा, अशा प्रसंगात अडकू नये. काळानुसार व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधनेला अधिक महत्त्व आहे. साधनेच्या दृष्टीने असे करणे अयोग्य आहे.’’ तिने मला हे भावनारहित आणि तत्त्वनिष्ठ होऊन स्पष्टपणे सांगितले. सौ. प्रियांकाचा साधनेच्या दृष्टीने हा विचार उच्च आहे. तिच्या माध्यमातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच अचूक आणि योग्य दिशा देत आहेत’, हे माझ्या लक्षात आले.

२. साधकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
सर्व साधक आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ईश्वरी प्रेरणेनेच समष्टी साधना करत आहेत. तेव्हा मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला साधनेच्या दृष्टीने योग्य तेच दृष्टीकोन देतात’, हे आपले भाग्य आहे. माझ्यामधील ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष दूर होण्यासाठी आणि माझा अहं न्यून व्हावा’, यासाठी श्रीकृष्णाने हा प्रसंग माझ्या लक्षात आणून दिला.’ त्या वेळी माझी श्रीकृष्णाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली. गुरुच साधकांना अचूक मार्गदर्शन करून साधकांना घडवतात.’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६९ वर्षे), फोंडा, गोवा. (२१.१.२०२५)