Koyna EarthQuake 2025 : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का !
कोयना धरण परिसरात ५ जानेवारी या दिवशी सकाळी ६.५६ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. वर्ष २०२५ च्या प्रारंभी राज्यात झालेला हा पहिलाच भूकंप आहे.