शिकण्‍याची वृत्ती, साधनेची तळमळ आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असलेल्‍या कोची, केरळ येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् (वय ४८ वर्षे) !

‘सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् या कोची येथील सेवाकेंद्रात सेवा करतात. त्‍यांची साधिकेच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत. 

सुश्री (कु.) रश्मी परमेश्वरन्

१. शिकण्‍याची वृत्ती 

१ अ. ‘मल्‍याळम्’ भाषा शिकणे : ‘रश्‍मीताईंना साधनेत येण्‍याआधी ‘मल्‍याळम्’ भाषा येत नव्‍हती. त्‍यांनी साधनेसाठी ती भाषा शिकून घेतली आणि त्‍या आता मल्‍याळम् ग्रंथांच्‍या अंतिम वाचनाची सेवा करतात. त्‍यांचे ‘मल्‍याळम् भाषेत प्रावीण्‍य कसे मिळवू शकतो’, याकडेे लक्ष असते.

१ आ. ‘पंखे कसे लावायचे ?’, हे शिकून घेणे आणि साधकांच्‍या साहाय्‍याने सेवाकेंद्रातील सर्व पंखे लावणे : रश्‍मीताईंना नवीन गोष्‍टी शिकण्‍याची पुष्‍कळ आवड आहे. कोची सेवाकेंद्रात एखादे नवीन यंत्र आणल्‍यास ताई त्‍याचा पूर्ण अभ्‍यास करतात आणि ‘त्‍याचा वापर कशा प्रकारे करायचा’, याचा विचार करतात. कोरोना महामारीच्‍या काळात कोची येथील सेवाकेंद्रात नवीन पंखे लावायचे होते. रश्‍मीताईंनी ‘पंखे कसे लावायचे ?’, ते शिकून घेतले आणि साधकांच्‍या साहाय्‍याने सेवाकेंद्रातील सर्व पंखे लावले.

सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर

२. इतरांना साहाय्‍य करणे 

त्‍यांना आयुर्वेद आणि घरगुती औषधे यांविषयी पुष्‍कळ माहिती आहे. त्‍या साधकांना त्‍या दृष्‍टीने साहाय्‍य करतात.

३. इतरांचा विचार करणे 

ताईंना शारीरिक त्रास होत असतांना एखाद्या साधकाने त्‍यांना अडचण विचारली, तर त्‍या साधकाची अडचण सोडवण्‍यासाठी प्रथम प्राधान्‍य देतात.

४. न्‍यूनता घेणे 

आधी काही प्रसंग झाल्‍यास त्‍या उपाययोजना काढण्‍यासाठी पुढाकार घेत नसत; पण आता त्‍या पुढाकार घेऊन आणि न्‍यूनता स्‍वीकारून प्रसंगात उपाययोजना काढण्‍याचा प्रयत्न  करतात.

५. तळमळ 

प्रवचनाची सिद्धता करतांना ‘समाजातील व्‍यक्‍तींना कोणते नवीन सूत्र सांगू शकतो’, याकडे ताईंचा कल असतो. ‘प्रवचनात नवीन सूत्रे सांगितल्‍यास लोकांना अधिक लाभ होईल’, असा ताईंचा विचार असतो.

६. गुरुंप्रती भाव आणि श्रद्धा 

ताईंमध्‍ये गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) प्रती पुष्‍कळ भाव आहे. कितीही कठीण परिस्‍थिती असली, तरीही ‘गुरुदेव समवेत आहेत आणि ते कठीण परिस्‍थितीतून बाहेर काढणार आहेत’, अशी ताईंची श्रद्धा आहे. त्‍यांना कधी पुष्‍कळ शारीरिक त्रास होत असतात. तेव्‍हा त्‍या गुरुदेवांच्‍या प्रती असलेल्‍या श्रद्धेच्‍या बळावर त्रासाला सामोर्‍या जातात.

‘गुरुदेवांच्‍या कृपेने रश्‍मीताईंमधील गुण माझ्‍या लक्षात आले आणि गुरुदेवांनीच माझ्‍याकडून ते लिहून घेतले’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर, कोची, केरळ. (२९.११.२०२४)