उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. धृति एच्.पी. ही या पिढीतील एक आहे !
धृती या शब्दाचा अर्थ : दृढता आणि लक्ष्मीचे एक नाव
पौष शुक्ल सप्तमी (६.१.२०२५) या दिवशी कु. धृति एच्.पी. हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. धृति एच्.पी. हिला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. ‘कु. धृति सतत आनंदी आणि उत्साही असते.
२. सेवेची आवड
धृतीच्या परीक्षेच्या दुसर्या दिवशी महाशिवरात्र होती. तिने अभ्यासाचे नियोजन करून ग्रंथप्रदर्शनाच्या कक्षावर सेवा केली. तिला हस्तकलेची आवड आहे. त्याचा उपयोग ती सेवेसाठी करते. एकदा मंदिर अधिवेशनात तिने उपायांसाठी खोके (बॉक्स) उत्कृष्ट रितीने सिद्ध केले होते.
३. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
एकदा मी सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या मुलाखतीचा हिंदी भाषेतील व्हिडिओ पहात होते. तेव्हा धृति दुसर्या खोलीतून आली आणि मला म्हणाली, ‘‘या संत आहेत ना ? संतच असे बोलू शकतात.’’ तिला हिंदी येत नाही, तरीही तिने संतांना ओळखले.
४. श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणे
४ अ. श्रीकृष्णाने स्वप्नात येऊन ‘काळे कपडे घातल्यावर वाईट शक्तींचा त्रास होतो’, असे सांगणे : कु. धृति लहान असतांना आम्ही तिच्यासाठी कपडे विकत घेण्यासाठी गेलो होतो. दुकानदाराने आम्हाला काळा झगा दाखवला होता. तेव्हा ‘कु. धृतिला कसे समाजावून सांगायचे ?’, असे आम्हाला वाटले. दुसर्या दिवशी सकाळी ती आम्हाला म्हणाली, ‘‘कृष्ण माझ्या स्वप्नात आला होता. त्याने मला ‘काळे कपडे घातल्यावर वाईट शक्तींचा त्रास होतो’, असे सांगितले.’’ तसेच तिला एखादा प्रश्न पडला, तर ती श्रीकृष्णाला विचारते आणि तिला उत्तर मिळते.
४ आ. आपत्काळाच्या दृष्टीने घराविषयी श्रीकृष्णाने सांगणे : सनातनचे (७५) वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांनी साधकांना आपत्काळाच्या दृष्टीने घर बांधण्याविषयी मार्गदर्शन केले होते. काही दिवसांनी धृतीने आम्हाला ‘योग्य ठिकाणी घर कसे बांधायचे ? आणि अयोग्य ठिकाणी घर बांधले, तर त्रास कसे होतील ?’, याविषयी सांगितले. तेव्हा तिने मला घराविषयी ‘श्रीकृष्णाने सांगितले आहे’, असे मला सांगितले.’
– सौ. रचना एच्.पी. (कु. धृतीची आई), चिक्कबळ्ळापूर, कर्नाटक. (२२.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|