टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मी तुम्हाला कळकळीने विनवतो की, सर्वांनी टाळ्या वाजवून मुखाने विठ्ठल नामाचा गजर करा.’’

इतरांना साहाय्य करणारे आणि धर्माभिमान्यांशी जवळीक साधणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. कार्तिक साळुंके (वय ३९ वर्षे) !

दादा जिज्ञासूंना साधनेमुळे स्वतःला आलेल्या अनुभूती आणि अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी कृतज्ञताभावाने सांगतात. त्यामुळे जिज्ञासूंना साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

कलियुगात स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन हा सर्व साधनामार्गांचा पाया !

कलियुगात स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन हा सर्व साधनामार्गांचा पाया ठरतो !

फोंडा, गोवा येथील श्री. मनोज सहस्रबुद्धे (वय ५५ वर्षे) यांना ध्यानात आलेल्या अनुभूती

मी पहाटे ध्यानाला बसलो असतांना माझे लक्ष श्वासावर केंद्रित झाले आणि त्याच क्षणी मला चंदनाचा सुगंध आला. माझ्या मनात ‘स्वस्वरूपे संस्थापिला श्रीमंत योगी’, ही एक ओळ तरळून गेली.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे तीव्र प्रारब्धाला सामोरे जाऊ शकणार्‍या सोलापूर येथील श्रीमती शशिकला व्हटकर !

‘सद्गुरु गाडगीळकाकांसारखे दिव्य आणि कृपावंत संत आम्हाला लाभणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची आमच्यावर अपार कृपा आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली.

पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी खंडित करणार ! – पिंपरी महापालिकेची चेतावणी

उन्हाळा चालू झाला असल्याने सध्या पाण्याची मागणी वाढली आहे. जूनमध्ये पाऊस पडण्याची शाश्वती नसल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. वाहन, रस्ते, घर, गृहनिर्माण संस्था परिसर धुण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर केल्यास प्राथमिक टप्प्यात नोटीस देऊन अवगत करण्यात येईल.

रस्ते खोदणे आणि बुजवणे ही कामे वेळेत अन् योग्य पद्धतीने करण्याचा पुणे पालिकेचा आदेश !

खोदण्याची कामे अनुमतीनुसार, तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार झाली नाहीत, तसेच खोदल्यानंतर रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याचे पहाणीमध्ये आढळले नाही, तर संबंधित पथ विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यावर कारवाई केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या झोपडपट्ट्यांतील कचरामुक्ती प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद नाही !

मुंबईत यापूर्वी ‘स्वच्छता मुंबई प्रबोधन अभियान’ नावाची योजनाही पूर्णपणे अपयशी ठरली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल अन् मलनि:सारण वाहिन्यांची नीट देखभाल करणे अशा ३ गोष्टी त्यांत होत्या.

मणेरवाडी (पुणे) येथे १५ वर्षीय मुलाची हत्या !

मैत्रीतून झालेल्या चुकीच्या समजुतीतून २ अल्पवयीन मुलांनी प्रकाश राजपूत या १५ वर्षीय शाळकरी मुलाची कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना मणेरवाडी (खानापूर, सिंहगड पायथा) परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये १८ मार्च या दिवशी दुपारी घडली.