‘पूर्वीच्या काळी सर्वसामान्य व्यक्तीची आध्यात्मिक पातळी अधिक प्रमाणात असायची. त्यांच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण कमी असायचे. त्यामुळे मुळातच व्यक्ती सात्त्विक वृत्तीची असल्यामुळे त्यांना साधना करणे सहज शक्य होत होते.
कलियुगामध्ये सर्वसामान्य व्यक्तीची आध्यात्मिक पातळी पुष्कळ कमी असते. त्याचबरोबर तिच्यातील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रताही अधिक असते. त्यामुळे हल्लीच्या काळात कोणत्याही साधनामार्गाने साधना करायची झाली, तरी साधनेसाठी आवश्यक मूलभूत सात्त्विकता वाढवणे आवश्यक ठरते. हा भाग केवळ स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांद्वारेच होऊ शकतो. त्यामुळे कलियुगात स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन हा सर्व साधनामार्गांचा पाया ठरतो !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले