‘माझ्या आईला (श्रीमती शशिकला रवींद्र व्हटकर (वय ५५ वर्षे) यांना) मूत्रपिंडाचा गंभीर आजार आहे. वर्ष २०२३ पासून तिच्या आजाराची तीव्रता वाढली आहे. आईला विविध शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होत आहेत. आईसाठी औषधोपचार करण्यासह आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आतापर्यंत ५० हून अधिक वेळा नामजपादी उपाय विचारले आहेत. केवळ सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे आई गंभीर आजारांना सामोरी जाऊ शकत आहे. गुरुकृपेने आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. साधिकेच्या आईच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढणे आणि त्याचे आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटणे
माझ्या आईच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प होते. सद्गुरु गाडगीळकाकांनी आईला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी दिलेला नामजप करायला आरंभ केल्यावर एका मासातच आईचे हिमोग्लोबिन ५ वरून ९.०८ ग्रॅम / डेसीलिटर झाले. (‘सर्वसाधारणपणे निरोगी महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.१ ते १५.१ ग्रॅम / डेसीलिटर, इतके असते.’ – संकलक) आधुनिक वैद्यांनी आईच्या तपासणीचा अहवाल पाहिल्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी काही दिवसांनी आईची पुन्हा तपासणी करायला सांगितली. त्या वेळी आईचे हिमोग्लोबिन १० ग्रॅम / डेसीलिटर इतके झाल्याचे आढळले. आमची सद्गुरु गाडगीळकाकांवरील श्रद्धा वृद्धींगत झाली आणि आम्ही नामजपादी उपाय केले. ५ मासानंतर आईचे हिमोग्लोबिन १२ ग्रॅम / डेसीलिटर झाले.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्यावर आईला त्वरित बरे वाटणे
माझी बहीण (कु. किरण व्हटकर) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. मी आईच्या समवेत सोलापूर सेवाकेंद्रात राहून साधना करत आहे. किरण सद्गुरु गाडगीळकाकांना आईसाठी नामजपादी उपाय विचारते. त्या वेळी सद्गुरु काका सूक्ष्मातून आईवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढतात आणि नामजपादी उपाय करतात. तेव्हा आईला त्वरित बरे वाटते.
३. साधिकेला सूक्ष्मातून ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आईच्या समोर बसून नामजपादी उपाय करत आहेत’, असे दिसणे
आम्ही (मी, किरण आणि आई) सद्गुरु काकांनी सांगितलेले नामजपादी उपाय करतो. मी आईसाठी नामजपादी उपाय करत असतांना प्रत्येक वेळी मला सूक्ष्मातून ‘सद्गुरु काका आईच्या समोर बसून नामजपादी उपाय करत आहेत. माझा नामजप करून झाल्यावर सद्गुरु काका अन्य सेवा करतात’, असे दिसते. त्या वेळी मला सद्गुरु काकांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि माझी भावजागृती होते.
४. साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे सद्गुरु गाडगीळकाकांचा आधार वाटणे आणि त्यांनी सांगितलेला नामजप केल्यामुळे आईला नामजप करण्याची गोडी लागणे
सूर्याच्या तेजाचे शब्दांत वर्णन करू शकत नाही. गुरु साधकांवर करत असलेले प्रेम शब्दातीत आहे. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सद्गुरु काका अनेक साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांना साहाय्य करत आहेत. सद्गुरु काकांनी आमच्या संकटकाळात नामजपादी उपायांच्या माध्यमातून केलेली कृपाच आम्हाला प्रतिदिन तारत आहे आणि आमचे मनोबल वाढवत आहे. सद्गुरु काकांमुळेच आम्ही आमच्या कठीण प्रारब्धाला सामोरे जाऊ शकत आहोत. आम्हाला प्रारब्धाची झळ जराही लागत नाही. विशेष म्हणजे सद्गुरु काकांनी सांगितलेल्या नामजपांमुळेच आईला नामजप करण्याची गोडी लागली. आईला कितीही त्रास होत असला, तरी ती शक्य होईल तेवढा अधिकाधिक नामजप करते.
‘सद्गुरु गाडगीळकाकांसारखे दिव्य आणि कृपावंत संत आम्हाला लाभणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची आमच्यावर अपार कृपा आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. गीता व्हटकर (श्रीमती व्हटकर यांची मुलगी), सोलापूर सेवाकेंद्र (२०.२.२०२४)
|