Telangana Christian School Controversy : तेलंगाणा येथील मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना भगवे कपडे घालून येण्यापासून रोखल्याने शाळेची तोडफोड !

शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अयोध्येत श्रीराममंदिर व्हावे आणि रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित व्हावी, ही गेल्या अनेक शतकांची हिंदूंची इच्छा यावर्षी पूर्ण झाली. त्यामुळे यावर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतांना रामभक्तांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.

श्रीमंत छत्रपती शाहू यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे केले घोषित !

छत्रपती शाहू यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याकडे १४ कोटी ३७ लाख २८ सहस्र ३९८ रुपयांची संपत्ती आहे.

राज्यात पुढील ४ दिवस अवेळी पावसाची शक्यता !

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

सांगली, कोल्हापूर येथे अवेळी पाऊस !

गेले अनेक दिवस उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवेळी पावसाने दिलासा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर, शिरोळ येथे अवेळी पावसाने उपस्थिती लावली

मुंबईत भ्रमणभाष चोरणार्‍या दोन सराईत चोरांना अटक !

आरोपींविरोधात मुंबईसह इतर परिसरात अनेक गुन्हे नोंद आहेत. विक्रम भोसले आणि बंटी भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी (पुणे) शहरातील विज्ञापन फलकांमुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्यास फलक मालकाचे दायित्व !

येत्या काही दिवसांमध्ये वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने फलक पडून जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्यास विज्ञापन फलकधारक उत्तरदायी असेल, अशी चेतावणी महापालिकेने दिली आहे.

पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे आकाराने मोठा आहे. ४ लोकसभा मतदारसंघ आणि ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे.

महाराष्ट्रात मतदानाच्या आवाहनासाठी निवडणूक आयोग घेणार प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य !

प्रसिद्ध व्यक्तींच्या आधाराने नव्हे, तर लोकप्रतिनिधींचे कार्य पाहून कधी मतदान होणार ?