
कोल्हापूर, १७ एप्रिल (वार्ता.) – गेले अनेक दिवस उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवेळी पावसाने दिलासा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर, शिरोळ येथे अवेळी पावसाने उपस्थिती लावली, तर सांगलीतही दुपारी ४ च्या सुमारास जोरदार वार्यासह गारा पडल्या. कुरुंदवाड, दत्तवाड यांसह अनेक गावांमध्ये चांगला पाऊस झाला. सांगलीत वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज गेली होती. ऐन वेळी आलेल्या पावसाने भाजीविक्रेते, तसेच व्यापारी, तसेच नागरिक यांची पळापळ झाली.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !