म्हातारपणी देवाचे नाव आठवण्यासाठी तरुणपणातच नामस्मरणाचा संस्कार मनावर करणे आवश्यक असणे 

‘म्हातारपणी विस्मरणामुळे काहीच आठवत नाही. त्यामुळे त्या वेळी देवाचे नाव तरी कसे आठवणार ? यासाठी नामस्मरणाचा संस्कार मनावर होण्यासाठी तरुणपणापासूनच अधिकाधिक नामस्मरण करावे. जेणेकरून म्हातारपणी देवाचे नामस्मरण करणे सुलभ होईल.’ 

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, या नामजपादी उपायांच्या वेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि काही प्रश्नोत्तरे येथे पाहूया.  

व्यष्टी-समष्टी आणि समष्टी-व्यष्टी स्तरांवरील ज्ञान

सगुण तत्त्वाकडून मिळणारे ज्ञान मर्यादित असल्याने ते अधिक प्रमाणात व्यक्तीशी संबंधित असते आणि निर्गुण तत्त्वाकडून मिळणारे ज्ञान अधिक व्यापक असल्याने ते विशिष्ट व्यक्तीशी अल्प प्रमाणात निगडित असते आणि समाज, राष्ट्र, धर्म अन् विश्व यांच्याशी अधिक प्रमाणात संबंधित असते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना साधिकेला आलेली अनुभूती

३ ते ७.२.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आले होते. त्या वेळी ध्यानमंदिरात नामजप करतांना मला आलेली अनुभूती येथे दिली आहे. 

मालवण शहरातील अनधिकृत फळविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

एस्.टी. बसस्थानकाजवळ फळविक्रेत्याकडून घडलेल्या प्रकारामुळे फळविक्रेत्यांविषयीची नागरिकांची विश्वासार्हता अल्प झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न उद्भवला आहे. फळविक्रेते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावून फळे विकतात.

हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीत ‘नाईट क्लब’कडून ध्वनीप्रदूषण चालूच

प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्याविना असे ध्वनीप्रदूषण होऊच शकत नाही !

‘एकल गीत’ रामायणात रोहित जोशी यांचे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव !

भाऊबीज, ३ नोव्हेंबर या दिवशी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या एकल गीत रामायण या सोहळ्यात श्री. रोहित जोशी यांनी एकाच दिवसात गीत रामायणातील ५६ गाणी गाऊन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले.

जुने गोवे येथे आणखी एक प्रकरण उघडकीस, २ जणांच्या विरोधात तक्रार

नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार शिवा मोरे आणि सरिता केरकर यांच्या विरोधात जुने गोवे पोलिसात प्रविष्ट (दाखल) झालेली आहे.

सातारा येथे चारचाकीतून ९५ लाख रुपयांची रोकड जप्त !

येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या पडताळणीत चारचाकीत ९५ लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे ? याचा पोलीस शोध घेत आहेत. रोकड कह्यात घेतली असून मनोज गोयल आणि दिपू चव्हाण यांना कह्यात घेतले आहे….

आमचे सरकार आल्यावर पुढची ५ वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू ! – उद्धव ठाकरे

राज्यातील मुलींना राज्य सरकार विनामूल्य उच्चशिक्षण देणार आहे. त्याही पुढे जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील मुलांनाही विनामूल्य शिक्षण देऊ; कारण दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत..