परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे. या उपायपद्धतीद्वारे व्याधीग्रस्त व्यक्ती कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःची व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा उन्नत साधकही अन्य आजारी व्यक्तीसाठी या उपायपद्धतीद्वारे त्याची व्याधी दूर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. त्यांच्या या गंभीर आजारपणात आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल, तसेच या उपचारपद्धतीचे महत्त्वही यातून अधोरेखित होईल.
या नामजपादी उपायांच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन आणि काही प्रश्नोत्तरे येथे पाहूया.
१. प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन
‘अ. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे ३ प्रकारचे उपाय असतात. आपण करत आहोत, ते आध्यात्मिक स्तरावरील उपाय आहेत आणि तेच सर्वांत महत्त्वाचे आहेत.
आ. संत बेशुद्ध असले, तरीही त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात. पू. आजी बेशुद्ध असल्या, तरी त्या आनंदच देत आहेत.’
२. काही प्रश्नोत्तरे
डॉ. नरेंद्र दाते : पू. आजी संत आहेत, तरीही त्यांना एवढी झुंज द्यावी लागते ! सर्वसामान्य माणसाविषयी असे असेल, तर काय होईल ?
प.पू. डॉक्टर : अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस मरूनच जाईल. पू. आजींची आध्यात्मिक पातळी ७८ टक्के असून त्या संत आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी ८० टक्के, ९० टक्के झाली की, अजून वेगळे होईल.
डॉ. नरेंद्र दाते : इतके दिवस उपाय करतांना ‘शरिराच्या खालच्या भागात अडथळा जाणवत होता, आता तो अडथळा अल्प होऊन वर-वर आला आहे. आता तो केवळ वरच्या भागात राहिला आहे’, असे जाणवते.
प.पू. डॉक्टर : तो अडथळा वरून निघून जाईल.
डॉ. नरेंद्र दाते : आज ‘मं’ हा जप करत असतांना ‘पुष्कळ उष्ण वाटले आणि सूक्ष्मातील युद्ध चालू आहे’, असे जाणवत होते.
प.पू. डॉक्टर : ते सूक्ष्म युद्धाच्या दृष्टीनेच होते.
डॉ. दुर्गेश सामंत : आरंभी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केल्यावर त्रासदायक वाटले, नंतर ‘मं’चा जप केल्यावर मोकळे झाल्यासारखे वाटले. तेव्हा ‘वायु येतो’, असे जाणवले. हा अडथळा बाहेरून आहे कि आतल्या प्राणशक्ती वहनामध्ये आहे ?
प.पू. डॉक्टर : संतांचा प्राण बाहेर पडायचे स्थान म्हणजे ब्रह्मरंध्र ! इतरांचा प्राण ब्रह्मरंध्रापर्यंत येत नाही. तो कुठल्याही चक्रातून बाहेर पडतो.
डॉ. दुर्गेश सामंत : या अडथळ्याचे स्वरूप काय असते ?
प.पू. डॉक्टर : धमनी आणि शिरा (Artery and Vein) यांतील अडथळा वेगळा आणि प्राणशक्तीवहनमधील अडथळा वेगळा आहे.
डॉ. दुर्गेश सामंत : अडथळा कुठल्यातरी आक्रमणामुळे निर्माण झालेला असतो कि त्यांचे प्रारब्ध असते ?
प.पू. डॉक्टर : त्यांचे प्रारब्ध आहे, त्यांचे वय झाले आहे, जायची वेळ आली; म्हणून अडथळा येतो.
डॉ. दुर्गेश सामंत : कुंडलिनीशक्तीशी याचा काही संबंध नाही ना ! संतांची कुंडलिनीशक्ती जागृत असते; म्हणून विचारले.
प.पू. डॉक्टर : कुंडलिनीशक्ती हे माध्यम असते. काही जणांचा श्वासातून प्राण बाहेर जाईल, काहींचा पोटातून, तर काहींचा लघवीच्या मार्गातून जाईल.
डॉ. दुर्गेश सामंत : एखाद्या सामान्य व्यक्तीचे श्वास ठरलेले आहेत. जो साधना करत नाही, तो ठरलेल्या वेळी जाणार; पण संतांच्या संदर्भात कसे असते ? त्यांना स्वतःचा देह सोडायचे स्वातंत्र्य असते का ?
प.पू. डॉक्टर : संतांना काही इच्छाच नसते !
डॉ. दुर्गेश सामंत : संत त्यांचा देह सोडण्याची वेळ ते पुढे-मागे करू शकतात का ?
प.पू. डॉक्टर : ते तसे करू शकतात; पण संतांना तशी इच्छाच नसते. देवाला काय करायचे, ते करू देतात.
डॉ. दुर्गेश सामंत : आपण नामजपादी उपाय करतो, म्हणजे ती वेळ पुढे-मागे करतो का ?
प.पू. डॉक्टर : आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण मिळाले आहे. यापूर्वी असे संशोधन झालेले नाही; म्हणून आपण करत आहोत.
डॉ. दुर्गेश सामंत : तुम्ही पूर्वी सांगितले होते, ‘प.पू. भक्तराज महाराज यांचा देहत्याग झाला, तेव्हा त्यांची कुंडलिनीशक्ती प्रक्षेपित झाली. अमुक टक्के अमुक व्यक्तीला मिळाली’. मग प्रत्येक संतांची अशी कुंडलिनीशक्ती प्रक्षेपित होते का ?
प.पू. डॉक्टर : समष्टी संतांची कुंडलिनीशक्ती प्रक्षेपित होते, तर व्यष्टी संतांची होत नाही. पू. आजी व्यष्टी संत आहेत. त्यांची कुंडलिनीशक्ती ‘याला मिळाली, त्याला मिळाली’, असे होणार नाही. त्यांची कुंडलिनीशक्ती ही त्यांच्यापुरतीच राहील. समष्टी संतांची कुंडलिनीशक्ती समाजाकडे प्रक्षेपित होईल.
डॉ. दुर्गेश सामंत : संतांना ‘देह सोडला काय किंवा राहिला काय’, यासंदर्भात इच्छा नसते. आपण हे शिकण्यासाठी नामजपादी उपाय करत आहोत. मग अडथळा का आणि कशाचा येत आहे ?
प.पू. डॉक्टर : देह सोडतांना जे घडणार होते, तेच घडत आहे. काय घडणार आहे ? त्याचा आपण अभ्यास करत आहोत. आपली शक्ती अधिक असेल, तर आपण त्याला विरोधही करतो. त्यामुळे मरण काही काळ पुढे ढकलले जाऊ शकते.’ (क्रमश:)
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे), पुणे. (१९.६.२०२४)
|