१. व्यष्टी-समष्टी स्तरावरील ज्ञान
सगुण तत्त्वाकडून मिळणारे ज्ञान मर्यादित असल्याने ते अधिक प्रमाणात व्यक्तीशी संबंधित असते. उदा. व्यक्तीच्या पूर्वजन्मांची साधना, व्यक्तीच्या वर्तमान जन्मातील साधना, तिच्या साधनेची वैशिष्ट्ये, तिच्याकडून होणारे कार्य, तिच्या साधनेचा मार्ग इत्यादी. समाज, राष्ट्र, धर्म आणि विश्व यांच्याशी संबंधित ज्ञान अल्प प्रमाणात असते. हे ज्ञान शक्यतो व्यष्टी प्रकृतीच्या संतांशी अधिक संबंधित असते.
२. समष्टी-व्यष्टी स्तरावरील ज्ञान
निर्गुण तत्त्वाकडून मिळणारे ज्ञान अधिक व्यापक असल्याने ते विशिष्ट व्यक्तीशी अल्प प्रमाणात निगडित असते आणि समाज, राष्ट्र, धर्म अन् विश्व यांच्याशी अधिक प्रमाणात संबंधित असते. यामध्ये सामाजिक परिवर्तन, राष्ट्र, धर्म आणि विश्व यांच्या संदर्भात भविष्यात घडणार्या महत्त्वपूर्ण घटना. उदा. तिसरे महायुद्ध, आपत्काळ यांच्याशी संबंधित ज्ञान असते. हे ज्ञान शक्यतो समष्टी प्रकृतीच्या आणि अवतारी संतांशी अधिक संबंधित असते.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आध्यात्मिक पातळी (टक्के), आध्यात्मिक संबोधन, आध्यात्मिक दशा आणि आध्यात्मिक अवस्था
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|