पुणे येथील प्रतिष्ठित महाविद्यालयांनी अनेक वर्षे लेखापरीक्षण केलेच नाही !

‘मॉर्डन’, ‘एस्.पी. ’, ‘गरवारे’, ‘फर्ग्युसन’ या महाविद्यालयांचा समावेश

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे ! – छ. उदयनराजे भोसले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसने काय नाही केले ? याची सूची मोठी आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे, असे वक्तव्य  भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी येथे केले.

सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !

सध्या कारागृहात असलेल्याा लॉरेन्स बिश्नोईने सलमानला काळवीट शिकार प्रकरणी आव्हान दिले होते. नुकतेच त्याच्या टोळीतील गुंडांनी सलमानच्या इमारतीवर गोळीबार केला.

चोरीच्या वृत्तानंतर बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४७ लाख रुपयांची भरपाई !

२ मार्च या दिवशी झालेली ही चोरी ४ मार्च या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली.

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ !

महिनाभरापूर्वी कळपातून भरकटलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात २ शेतकर्‍यांना ठार करून ३ दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला आहे.

मावळ (पुणे) लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी प्राप्त !

उमेदवारांची अर्ज प्रक्रिया चालू होण्यापूर्वी ५२ तक्रारी आणि त्यानंतरच्या ८ दिवसांमध्ये १६ तक्रारींची वाढ झालेली आहे. त्यातील १३ तक्रारींवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, तर ५५ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.

अमरावती, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले !

लोकसभेसाठी मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात विदर्भात ५३.५१ टक्के मतदान !

सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम !

जिल्हा न्यायालयाची सध्याची इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नव्या इमारतीच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ येत्या १ मे या दिवशी होणार आहे.

नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !

येथील जुने न्यायालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर अनेक वर्षांपासून मधमाशांचे पोळे आहे. २३ एप्रिल या दिवशी सायंकाळी अचानक सर्व मधमाशांनी पोळ्यावरून उठत परिसरातील ७० ते ८० नागरिकांवर आक्रमण करत त्यांचा चावा घेतला.

कृतघ्नपणाची ही परिसीमाच !

‘आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. ही कृतघ्नपणाची परिसीमा होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले