देशाच्या अखंडतेसाठी शिवछत्रपतींचे विचार मार्गदर्शक ! – छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – शिवछत्रपतींचे विचार सर्वांनी अंगीकारले पाहिजेत. त्यामुळेच देशाची अखंडता टिकून राहील. देशाच्या अखंडतेसाठी शिवछत्रपतींचे विचार आजही मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. येथील ‘जलमंदिर पॅलेस’मध्ये गुढी उभारून गुढीपूजन केल्यानंतर खासदार भोसले प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

खासदार भोसले पुढे म्हणाले, ‘‘गुढीपाडव्यानिमित्त मी राजघराण्याच्या वतीने समस्त महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देतो. तसेच प्रत्येकाच्या मनातील स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो.

गुढीपाडव्याविषयी अपसमज पसरवणार्‍यांना चपराक !

छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू आणि गुढीपाडवा यांचा तथाकथित संबंध जोडून गुढीपाडवा साजरे न करण्याचे काही जात्यंधांकडून आवाहन केले जाते. अपसमज पसरवले जातात. छत्रपती उदयनराजे यांनी स्वत: गुढीपाडवा साजरा करून जात्यंधांना चपराक लगावली आहे.