सातारा येथील श्री काळाराम मंदिरात ‘रामनवमी उत्सवा’स प्रारंभ !

सातारा येथील श्री काळाराम मंदिर

सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही ९ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत श्री काळाराम मंदिरात ‘रामनवमी उत्सवा’स मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.

उत्सवकाळात प्रतिदिन सकाळी ५ ते ५.३० या वेळेत श्रींची काकड आरती, पहाटे ५.३० ते ६ या वेळेत श्रींना अभिषेक, सकाळी ८ ते ८.३० या वेळेत आरती, दुपारी १२ वाजता नैवेद्य, दुपारी ४ वाजता भजन, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत वे.शा.सं. पू. श्रीकृष्णशास्त्री जोशी यांचे ‘अध्यात्म रामायण’ या विषयावर मार्गदर्शन, रात्री ९.३० वाजता महाआरती होणार आहे. तसेच उत्सव काळात प्रतिदिन सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये भरतनाट्यम, भक्तीगीत, भावगीत, रामरक्षापठण आदी कार्यक्रम होणार आहेत. १७ एप्रिल या दिवशी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत पुणे येथील ह.भ.प. रोहितबुवा वाळिंबे यांचे ‘श्रीराम जन्मकाळा’चे कीर्तन होईल. रात्री १० वाजता ‘कर्पूर’ महाआरती होईल. १८ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता लळीताचे कीर्तन होऊन रामनवमी उत्सवाची सांगता होईल. मंदिरातील

सर्व कार्यक्रम भाविक-भक्तांच्या देणग्यांमधून पार पाडले जातात. तरी समस्त श्रीरामभक्तांनी या उत्सवामध्ये यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर विश्वस्त मोहनभाई शहा यांनी केले आहे.