तुर्भे गाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन !

नवी मुंबई – तुर्भे गाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत श्री रामतनुमाता मंदिर येथे श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराजांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या उत्सवाचे हे ८४ वे वर्ष आहे.

या उत्सवा निमित्त १० ते १६ एप्रिल या कालावधीत सकाळी ६ ते ७ जप, सकाळी ७ ते ८, सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत अखंड रामनाम, श्रीरामतनु चरितायन, दुपारी २ ते ३ रामरक्षा सहस्रावर्तने, दुपारी ३ ते ५ अखंड रामनाम (शांता महिला मंडळ), सायं ५  ते ६ हरिपाठ गजर, सायंकाळी ९ ते १०.३० भजन (शांता महिला मंडळ) असे कार्यक्रम असतील.

१७ एप्रिल म्हणजेच श्रीरामजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ६.३० ते ७.३० श्रीरामतनु चरितायन (शांता महिला मंडळ), सकाळी ८ ते ९ या वेळेत कलावती माता भजन मंडळ, तुर्भे, सकाळी ९ ते १०.३० या वेळेत श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळाचे भजन, (गायिका कु. प्राप्ती पाटील, पखवाद : गोरखनाथ पाटील, तबला कु. धीरज म्हात्रे (खुटारी), साथसंगत : मनस्वी पाटील, तपस्वी पाटील, स्नेहा पाटील, दुर्वा पाटील, रिद्धी म्हात्रे, देवांशी पाटील, दैविक पाटील) सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० श्रीरामजन्म कीर्तन समर्थभक्त अमेयबुवा रामदासी (डोंबिवली), संवादिनी : कु. सोहम् ओळकर, तबला कु. प्रभंजन भट, दुपारी १ वाजता महाप्रसाद, तर सायंकाळी ७ ते १० या वेळेत तुर्भे गाव परिसरात पालखी सोहळा (पालखीसाथ गणेश प्रा. भजन मंडळ, तुर्भे बुवा बाळाराम पाटील, पखवाद वादक कुणाल पाटील) आहे.