कोल्हापूर येथे बनावट नोटांचे मुद्रण करणार्‍या टोळीस अटक !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर – ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे मुद्रण करून त्या चलनात खपवणार्‍या ७ जणांच्या टोळीस शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. रोहन सूर्यवंशी, कुंदन पुजारी, ऋषकेश पास्ते, अजिंक्य चव्हाण, केतन थोरात, रोहित मुळे, आकाश पाटील अशी त्यांची नावे आहेत. बँकेच्या ‘सी.डी.एम्.’ यंत्रात पैसे भरणा करतांना ५० सहस्र रुपयांपैकी १० सहस्र रुपये स्वीकारले गेले नसल्याने हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणातील मूळ सूत्रधार हा कराड येथील रोहित मुळे हा ‘ग्राफिक डिझाईनर’ आहे.

२८ मार्चला राजारामपुरी येथील एका ‘ए.टी.एम्.’ केंद्राच्या ‘डिपॉझिट’ यंत्रात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार प्रविष्ट झाली होती. पोलिसांनी अधिक अन्वेषण केल्यावर पोलिसांनी पैसे जमा करणार्‍या एका संशयितास कह्यात घेतल्यावर या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या प्रकरणात प्रिंटर, कागद, भ्रमणसंगणक, तसेच अन्य काही साहित्य जप्त केले आहे.