‘मिरज येथील कु. राम राघवेंद्र आचार्य (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) याची त्याच्या आत्यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. नियमितपणा
‘रामची दिनचर्या ठरलेली असून तो नियोजित वेळीच सर्व काही करतो. वयाच्या ८ व्या वर्षी त्याची मुंज झालेल्या दिवसापासूनच तो प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी संध्यावंदन अन् ठरलेल्या वेळेत नामजप आणि उपाय नियमित करतो.
२. समजूतदार
राम अत्यंत समजूतदार आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगितली आणि त्याला ती स्वीकारण्यास कठीण जात असली, तरीही तो ती स्वीकारतो. तो सेवा किंवा कृती आनंदाने करतो. तो इतर मुलांप्रमाणे हट्ट करत नाही.
३. प्रेमभाव
तो जे खरे आहे, ते स्पष्टपणे आणि प्रेमाने सांगतो. तो इतरांच्या चुका त्यांना न दुखावता सांगतो.
४. मोठ्यांशी आदराने बोलणे
तो वयस्करांनी सांगितलेली गोष्ट आधी करतो. मोठ्यांना मान देणे आणि त्यांच्याशी आदराने बोलणे, हे मुळातच त्याच्या स्वभावात आहे.
५. इतरांची काळजी घेणे
राम लहान-मोठ्या सर्वांची नीट काळजी घेतो. ‘एकदा आम्ही प्रवासात असतांना ‘आम्हाला कुणाला काही पाहिजे का आणि सर्वांना बसायला आसन नीट आहे ना ?’, हेही तो अगत्याने पहात होता.
६. तत्परतेने साहाय्य करणे
राम एखाद्या सेवेत व्यस्त असतांना त्याला कुणी साहाय्य मागितले, तरी तो आनंदाने, सहजपणे आणि तत्परतेने करतो.
७. धाडसी
शाळेत काही चुकीचे लक्षात आल्यास तो पटकन पुढे जाऊन सांगतो.
८. चिकाटी
शाळेतून सांगितलेला कार्यानुभवाचा अभ्यास तो चिकाटीने आणि ध्यास धरून वेळेच्या आत पूर्ण करायचा.
९. सात्त्विकतेची ओढ
रामला कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ आवडत नाहीत. त्यामुळे इतर मुलांप्रमाणे त्याचे बाहेरचे खाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
१०. रामला व्यायाम, योगासने, मल्लखांब आणि इतर खेळांचीही आवड आहे. तो ते लहानपणापासून आवडीने शिकून करत आहे.
११. राममध्ये गुरूंप्रती दृढ श्रद्धा असल्याने त्याच्यात आत्मविश्वास आणि धाडस हे गुण विकसित झाले आहेत. देवाने त्याला बुद्धीचातुर्य आणि आकलनक्षमता अत्यंत चांगली दिली आहे.
१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
अ. राममध्ये श्री गुरूंच्या प्रती पुष्कळ भाव असून त्याला गुरुभेटीची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सुट्टीत तो रामनाथी आश्रमात सेवेसाठी २ – ३ मास आधीपासूनच प्रयत्न करतो.
आ. तो कार्यपद्धतीनुसार सर्व कृती करतो आणि रामनाथी आश्रमात जाण्याची अनुमती मिळेपर्यंत केंद्रसेवकांना सांगून त्यांचा पाठपुरावा करतो. यातून त्याची गुरूंप्रतीची ओढ आणि त्यांच्या भेटीची तळमळ लक्षात येते.
‘सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला रामसारखा दैवी भाचा लाभला’, याबद्दल आम्ही गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘त्याची पुढील प्रगतीही अशीच शीघ्र गतीने करून घ्या’, अशी आम्ही सर्वजणी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना करतो.’
– सुश्री (कु.) माधवी कृष्णराव आचार्य, सुश्री (कु.) शशिकला आचार्य, सुश्री (कु.) मोहिनी आचार्य, सुश्री (कु.) वनिता आचार्य आणि सुश्री (कु.) सुरेखा कृष्णराव आचार्य (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६६ वर्षे) (श्री. राम याच्या आत्या), मिरज, सांगली (३.८.२०२३)