१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून भावजागृती होणे आणि मन कृतज्ञतेने भरून येणे
‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेल्या रथोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना रथात बसलेले पाहून माझ्या मनात पुढील विचार आले – ‘महर्षीनी सांगितले नसते, तर साधकांना काहीच कळले नसते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत. ते सच्चिदानंद परब्रह्म असून सर्वांची गुरुमाऊली आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि माझे मन कृतज्ञतेने भरून आले. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकांसाठीच सर्वकाही करतात’, असा विचार माझ्या मनात येऊन माझा भाव जागृत झाला. माझे मस्तक आपोआप झुकले आणि कितीतरी वेळ मी कृतज्ञताभावातच होते.
२. रथोत्सवाच्या वेळी होणार्या भावजागृतीच्या वेळी सतत तीन गुरूंची महती आठवून साधिकेचे मनही विशाल होणे
यापूर्वीही माझी अनेक वेळा भावजागृती झाली आहे; पण त्या वेळी केवळ गुरुदेवांच्या महतीची आठवण होऊन मला त्यांनी केलेले साहाय्य आठवून, दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून आणि मानसपूजेच्या माध्यमातून भावजागृती होत होती. या वेळी ‘माझे मन विशाल झाले आहे’, असे मला वाटले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची गुरुमाऊलीप्रमाणे सर्व साधकांवर असणारी प्रीती आणि त्यांची देवीप्रमाणे असणारी त्यांच्यातील विशालता या भावजागृतीमध्ये मला जाणवली.’
– श्रीमती मनीषा केळकर (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |