सौ. निवेदिता उपासनी (पू. (कै.) दत्तात्रेय देशपांडे यांची मुलगी) देवद आश्रमात आल्या असतांना त्यांचा हरवलेला सोन्याचा अलंकार त्यांना १० दिवसांनी तेथे परत आल्यावर मिळाल्याने त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

पू. दत्तात्रेय देशपांडे

‘७.५.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात माझ्या वडिलांना (पू. दत्तात्रेय देशपांडे यांना) देवाज्ञा झाली’, असे मला समजले. मी आणि माझे नातेवाईक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देवदला आश्रमात आलो. वडिलांचे अंत्यदर्शन घेतांना मन भरून आले होते. आश्रमातील वातावरण प्रसन्न होते. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, तसेच शिस्त या सर्व गोष्टी तेथे प्रकर्षाने जाणवत होत्या. त्याचबरोबर मला येथील साधकांमधील प्रामाणिकपणाचा अनुभव प्रत्यक्ष निदर्शनास आला. तो अनुभव मी कथन करते.

७.५.२०२३ या दिवशी कै. पू. बाबांचे अंत्यदर्शन घेऊन आम्ही घरी परतलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझ्या एका कानातील अलंकार (‘टॉप’) कुठेतरी पडला आहे. मी सगळीकडे शोधले; पण तो मिळाला नाही. त्या वेळी आश्रमात चौकशी करायचे माझ्या लक्षात आले नाही. त्यानंतर १० दिवसांनी आम्ही दशक्रिया विधीसाठी आश्रमात आलो. हा विषय मी तेथील साधक श्री. अविनाश गिरकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६९ वर्षे) यांच्या कानावर घातला. त्यांनी लगेच प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘मागील ७ – ८ दिवसांपासून आश्रमाच्या फलकावर ‘कुणाचा कानातील सोन्याचा अलंकार हरवला आहे का ?’, अशी सूचना लिहिली होती. मी संबंधितांकडे विचारणा करतो आणि सांगतो.’’ त्यानंतर त्यांनी सर्व विचारणा करून तो सोन्याचा अलंकार क्षणाचाही विलंब न लावता मला आणून दिला. मला पुष्कळ आनंद झाला. ज्यांनी हा सोन्याचा अलंकार उचलून ठेवला, तसेच माझ्यापर्यंत आणून दिला, त्यांना अनेक अनेक धन्यवाद ! सनातनचे सर्व साधक आणि गुरु यांना कोटीशः धन्यवाद !’

– आपली कृतज्ञ,

सौ. निवेदिता उपासनी (पू. (कै.) दत्तात्रेय देशपांडे यांची मुलगी, वय ५५ वर्षे), पुणे. (१६.५.२०२३)