‘गुरुदेव, आपण आपले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवंताकडे लावण्याकरता प्रतिदिनचा नेम लावून घेतला आहे. आपली प्रत्येक क्रिया भगवत्प्राप्तीकरता घडेल, अशी ठेवली. या तिन्ही गुणांचे, म्हणजेच स्वतःतील ३ गुणांचे उदात्तीकरण होते. तिन्ही गुण उदात्तहोतात. भगवंताकडे पोचवतात. आपण या तिन्ही गुणांचा चतुराईने वापर करता कि त्यांचा स्पर्श होऊ देत नाही ? साक्षीत्व सांभाळता ? साक्षीत्वाकरताच त्रिगुणांचा वापर अथवा त्रिगुणांकरता साक्षीत्व दोन्ही एकच !’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२२)