खोकल्यावर अत्यंत उपयुक्त ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’
कोणत्याही प्रकारच्या खोकल्यामध्ये चहाचा पाव चमचा सुंठ चूर्ण तेवढ्याच मधात मिसळून ४ – ५ दिवस दिवसातून ४ वेळा चाटून खावे. मध उपलब्ध नसल्यास चमचाभर पाण्यात कालवून चाटावे. खोकल्यावरील हे नामी औषध आहे.