‘व्‍हॅलेंटाईन डे’ या पाश्‍चात्त्य कुप्रथेविषयी प्रबोधनासाठी प्रसारसाहित्‍य उपलब्‍ध !

हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांना सूचना !

भारतामध्‍ये १४ फेब्रुवारी या दिवशी पाश्‍चात्त्यांच्‍या नीतीहीन चंगळवादाचे अनुकरण असलेला ‘व्‍हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. या संदर्भात युवकांमध्‍ये प्रबोधन करण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने पुढील प्रसारसहित्‍य नेहमीच्‍या ठिकाणी उपलब्‍ध केले आहे, असे समितीच्‍या वतीने कळवण्‍यात आले आहे.

१. ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्‍तपत्रक

२. गर्दीच्‍या ठिकाणी लावण्‍यासाठी २.२५ फूट × ३.५ फूट आकारातील फलक

३. गर्दीच्‍या ठिकाणी लावण्‍यासाठी ८ फूट × ६ फूट आकारातील ‘होर्डींग’

४. ‘ए २’ आकारातील हस्‍तफलक

वरील प्रसारसाहित्‍यासाठी प्रायोजक मिळवून त्‍याचा सुयोग्‍य वापर करावा.