खोकल्‍यावर अत्‍यंत उपयुक्‍त ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’

सनातनची आयुर्वेदाची औषधे

खोकला कोरडा किंवा कफयुक्‍त, कोणत्‍याही प्रकारचा असो, पहिल्‍यांदा आठवावे असे औषध म्‍हणजे ‘सुंठ’. कोणत्‍याही प्रकारच्‍या खोकल्‍यामध्‍ये चहाचा पाव चमचा सुंठ चूर्ण तेवढ्याच मधात मिसळून ४ – ५ दिवस दिवसातून ४ वेळा चाटून खावे. मध उपलब्‍ध नसल्‍यास चमचाभर पाण्‍यात कालवून चाटावे. खोकल्‍यावरील हे नामी औषध आहे.

वैद्य मेघराज पराडकर

यासाठीच ‘सुंठीवाचून खोकला गेला’, ही म्‍हण रूढ झाली आहे. सुंठ चूर्णामध्‍ये बहुतेक वेळा पिठाची भेसळ केली जाते. त्‍यामुळे सुंठीचा तिखटपणा न्‍यून होतो आणि गुणही म्‍हणावा तसा येत नाही. ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’ निर्भेळ असल्‍याने अत्‍यंत गुणकारी आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)