संतांनी वापरलेल्‍या, तसेच तीर्थक्षेत्री असलेल्‍या दुर्मिळ वस्‍तूंचा अनमोल ठेवा भावी पिढीसाठी जतन करणार्‍या ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या संग्रहालयाच्‍या सेवांमध्‍ये सहभागी व्‍हा !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना प्राप्‍त झालेले ज्ञान आजवरच्‍या अनेक पिढ्यांनी विविध माध्‍यमांतून जपून ठेवले आहे. त्‍यामुळेच आज आपल्‍याला त्‍या ज्ञानाचा सर्वंकष लाभ होत आहे. अनादी काळापासून चालत आलेला हिंदु धर्म आणि त्‍याची आध्‍यात्मिक परंपरा यांचा अमूल्‍य ठेवा भावी पिढीसाठी जतन करण्‍याचे कार्य ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने केले जात आहे. देश-विदेशांत भ्रमण करून  ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’चे विद्यार्थी-साधक हिंदु धर्म, तसेच संस्‍कृती यांच्‍याशी संबंधित, तसेच संतांनी वापरलेल्‍या अन् तीर्थक्षेत्री मिळणार्‍या दुर्मिळ वस्‍तूंचा संग्रह करत आहेत. या सर्व वस्‍तू सध्‍याच्‍या काळातील चैतन्‍याचा स्रोत असून पुढील पिढीसाठी चैतन्‍य देणार्‍या आहेत.

१ – २ वर्षांत महाभीषण आपत्‍काळाला आरंभ होणार असल्‍याचे अनेक नाडीपट्टीवाचक, तसेच द्रष्‍टे साधू-संत यांनी सांगितले आहे. पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणारा आणि आध्‍यात्‍मिक संस्‍कृतीची शास्‍त्रीय परिभाषेत ओळख करून देणारा हा ठेवा आपत्‍काळापूर्वी जतन करणे आवश्‍यक आहे. हे कार्य शीघ्रतेने व्‍हावे, यासाठी पुढील सेवांसाठी सध्‍या फोंडा, गोवा येथील संशोधन केंद्रात तातडीने मनुष्‍यबळाची आवश्‍यकता आहे.

१. संग्राह्य वस्‍तूंच्‍या संगणकात नोंदी करणे

१ अ. एक सहस्रहून अधिक वस्‍तूंच्‍या संगणकीय नोंदी करणे आणि त्‍या नोंदींची पुनर्पडताळणी करणे

१ आ. ३०० ते ४०० ‘एक्‍सेल शीट’मधील लिखाण नवीन संगणकीय प्रणालीत घेणे

१ इ. विविध प्रकारच्‍या १३ सहस्रांहून अधिक संग्राह्य वस्‍तूंची तपासणी करून त्‍या जतन करण्‍याची प्रक्रिया करणे आणि त्‍यांच्‍या संगणकीय नोंदी करणे

विविध चित्रे, मूर्ती, लाकडी वस्‍तू, वनस्‍पती, तसेच नद्यांचे पाणी, तीर्थक्षेत्रीचे तीर्थ, दगड, माती, संतांची नखे आणि केस यांसारख्‍या वस्‍तू जतन करण्‍याचे ज्ञान असणारे किंवा या सर्वांचा अभ्‍यास करण्‍यास इच्‍छुक असणारे साधक ही सेवा करू शकतील.

२. वस्‍तूंची बांधणी (पॅकिंग) करणे

२ अ. दोन सहस्रांहून अधिक वस्‍तूंची संदर्भासाठी भ्रमणभाषमध्‍ये छायाचित्रे काढणे आणि त्‍या वस्‍तूंची बांधणी करणे

२ आ. कीड वा बुरशी लागून वस्‍तू खराब होऊ नयेत, यासाठी प्रतिवर्षी ऑक्‍टोबर ते मे मासाच्‍या कालावधीत ५ सहस्रांहून अधिक वस्‍तू उन्‍हात ठेवणे आणि त्‍यांची पुनर्बांधणी करणे

३. पाच सहस्रांहून अधिक वस्‍तूंना विषयानुरूप संकेतांक देणे

(संकेतांक देणे : वेगवेगळ्‍या बारकाव्‍यांनुसार वस्‍तूंना विशिष्‍ट संकेतांक दिले जातात आणि त्‍या वस्‍तू संग्रही ठेवल्‍या जातात. संकेतांकांमुळे वस्‍तू आवश्‍यकतेनुसार शोधणे सोपे जाते. त्‍यामुळे संकेतांक देणे अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे.)

४. एक सहस्र ७०० हून अधिक वस्‍तूंच्‍या नोंदींचे शुद्धलेखन पडताळणे (ही सेवा घरी राहूनही करता येईल.)

५. संग्राह्य वस्‍तू अनेक वर्षे सुस्‍थितीत रहाव्‍यात, यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या पद्धतींचा अभ्‍यास करणे, त्‍याविषयीची माहिती एकत्रित करणे आणि त्‍यासाठी आवश्‍यक सामुग्रीचा अभ्‍यास, तसेच खरेदी यांसाठी साहाय्‍य करणे (ही सेवा घरी राहूनही करता येईल.)

वरील सेवांसाठी मराठी आणि इंग्रजी या भाषांत टंकलेखन, ‘एक्‍सेल शीट’चे ज्ञान, तसेच मराठी व्‍याकरणाचे जुजबी ज्ञान आवश्‍यक आहे.

या सेवा करण्‍यास इच्‍छुक असल्‍यास; परंतु त्‍या सेवेचे कौशल्‍य नसल्‍यास सेवांच्‍या संदर्भातील प्रशिक्षण देण्‍यात येईल. इच्‍छुकांनी बाजूच्‍या सारणीत स्‍वत:ची माहिती श्री. अभिजित सावंत यांच्‍या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा बाजूच्‍या टपाल पत्त्यावर पाठवावी.

‘अनमोल वस्‍तू जतन करणे’ ही सेवा साधना म्‍हणून करण्‍यासाठी उपलब्‍ध होत आहे. या संधीचा सर्वांनी आध्‍यात्‍मिक उन्‍नतीसाठी लाभ करून घ्‍यावा ! (१२.९.२०२२)

टपालासाठी पत्ता

श्री. अभिजित सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्‍स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्‍डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१