बीड जाळपोळ प्रकरण !
बीड – येथे दगडफेक आणि जाळपोळ झाली असून यामध्ये अटक केलेले आरोपी समाजकंटक आहेत. ते कोणत्या समाजाचे आहेत, याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. आम्ही जाळपोळ आणि दगडफेक करणार्यांना अटक करत आहोत, तसेच ते आमच्यासाठी फक्त आरोपी आहेत, अशी प्रतिक्रिया येथील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर बीड पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जाळपोळीच्या घटनेत छगन भुजबळ यांचे समर्थक अधिवक्ता सुभाष राऊत यांच्या उपाहारगृहाला आग लावण्यात आली होती. त्यानंतर ‘ही जाळपोळ करणारे भुजबळ यांचेच नातेवाईक आहेत’, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला होता.