दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी
मुंबई – पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी करणार्या एका महिलेविरोधात नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शैला गुरव (वय ३८ वर्षे) असे या महिलेचे नाव असून ती जोगेश्वरी परिसरातील रहिवासी आहे. चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात ही घटना घडली.
या महिलेने प्रत्येक मासाला ५ सहस्र रुपये देण्याची मागणी एका दुकानदाराकडे केली होती. पैसे न दिल्यास गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्याची धमकीही तिने त्याला दिली. दुकानदाराला तिचा संशय आल्याने त्याने या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी महिलेला कह्यात घेतले आणि नोटीस देऊन सोडून दिले.
संपादकीय भूमिकापोलिसांच्या नावे असा खोटेपणा करणार्यांना सोडून देतांना त्यांना शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |