नागपूर आणि धुळे येथील २ सहकारी सूतगिरण्यांवर आयकर विभागाच्या धाडी !

येथील तुकाराम उपाख्य बंडू किसन तागडे यांच्या ‘मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणी’वर नागपूर येथील आयकर विभागाने ३० सप्टेंबर या दिवशी धाड घातली. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवरही धाड घालण्यात आली आहे.

हिंदु वारसा मास !

ऑक्‍टोबर मास हिंदूंसाठी विशेष आहे. या मासात नवरात्री आणि दिवाळी हे दोन मोठे सण येतात. त्‍यामुळे अमेरिकेच्‍या जॉर्जिया राज्‍याने ‘ऑक्‍टोबर’ या मासाला अधिकृतपणे ‘हिंदु हेरिटेज मंथ’ (हिंदु वारसा मास) म्‍हणून घोषित केले आहे.

मिरज येथे गणेशोत्सव मंडळांची उत्साही वातावरणात आणि शांततेत २४ घंटे मिरवणूक !

अनंतचतुर्दशीच्या दिवशी मिरज येथे शांततेत श्री गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक पार पडली. अनुमाने १७३ श्री गणेशमूर्तींचे येथील गणेश तलावात विसर्जन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १ लाख ४६ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन !

एकीकडे महानगरपालिका नदीपात्रात विसर्जन करण्‍यास बळजोरीने बंदी घालते, तर दुसरीकडे याचा अपलाभ घेत मोठ्या प्रमाणात कृत्रिम विसर्जन हौद, श्री गणेशमूर्ती संकलन केंद्र, असे धर्मद्रोही पर्याय भाविकांवर लादून त्यांच्याकडून मूर्तीदान घेऊन अवैधपणे त्या मूर्तींच्या विक्रीचा घाट घातला जातो….

दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये  चोरी करणारे धर्मांध अटकेत !

त्यांनी अपंगाच्या डब्यात शिरून कल्याण ते इगतपुरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये गॅस कटरच्या साहाय्याने डब्यातील पत्र्याचा काही भाग कापून ही चोरी केली.

काश्‍मिरी मुसलमान विद्यार्थ्‍यांची देशविरोधी मानसिकता जाणा !

झाशी येथील बरुआसागर नवोदय विद्यालयाचे २० हिंदु विद्यार्थी काश्‍मीरमधील राजौरी नवोदय विद्यालयात शिकण्‍यासाठी गेले असता त्‍यांना तेथे मारहाण करण्‍यासह देशविरोधी घोषणाबाजी करायला भाग पाडले, तसेच देवतांची चित्रे फाडण्‍यात आली.

हिंदु युवती भ्रमित होण्यामागील कारण !

हिंदु युवती भ्रमित होण्यामागे बॉलीवूड, सामाजिक माध्यमे, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ आणि टीव्हीवरील विज्ञापने कारणीभूत ठरत आहेत.