निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४१
‘कधीतरी जेवणात एखादा पदार्थ पुष्कळ तिखट असतो. ज्यांना तिखट पचत नाही, त्यांना असे पदार्थ खाल्ल्याने घसा, छाती, गुदद्वार, तसेच मूत्रमार्ग यांच्या ठिकाणी जळजळ होऊ शकते. असे जास्त तिखट जेवण झाल्यावर लगेच १ – २ चमचे तूप खावे आणि वर कोमट पाणी प्यावे. असे केल्याने तिखट बाधत नाही आणि पुढचे त्रास टळतात. (हा उपाय चुकून कधीतरी तिखट खाल्ले गेल्यास करावा. नेहमी तिखट खाण्यासाठी याचा उपयोग करू नये.)
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan