कॅनडाचा नरमाईचा सूर !

परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारत-कॅनडा संबंधावर विश्‍लेषण

‘जी-७’ (कॅनडा, फ्रान्‍स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या ७ विकसित देशांचा गट), युरोप यांच्‍याकडून कोणतेही समर्थन न मिळाल्‍याने अपेक्षेप्रमाणे कॅनडाने आता नरमाईचा सूर घेतला आहे. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्‍लेयर म्‍हणतात, ‘‘भारताशी आमचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. आम्‍ही त्‍याचा आदर करतो.’’ मागच्‍या वर्षी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांना चीनच्‍या जिनपिंग यांनी झापले होते. आता भारताने ट्रुडो यांना त्‍यांची जागा दाखवून दिली.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

कॅनडाने आता गंभीर आत्‍मपरीक्षण करावे !

जस्‍टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्‍या निराधार आरोपानंतर कॅनडात २ ठिकाणी भारतविरोधी निदर्शने झाली. त्‍यात १०० हून अधिक शिखांचाही सहभाग नव्‍हता. कॅनडामधील ज्‍या ८ लाख शिखांच्‍या मतांवर डोळा ठेवून ट्रुडो यांनी भारतावर निराधार आरोप केले, त्‍यांनी आता गंभीर आत्‍मपरीक्षण करावे.