लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
ठाणे, १ ऑक्टोबर (वार्ता.) – दादर-गोरखपूर एक्सप्रेसच्या पार्सलच्या डब्यातून लाखो रुपयांचे पार्सल चोरणाऱ्या ५ धर्मांधांना कल्याण रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ३ राज्यांतून अटक केली आहे. त्यांनी अपंगाच्या डब्यात शिरून कल्याण ते इगतपुरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये गॅस कटरच्या साहाय्याने डब्यातील पत्र्याचा काही भाग कापून ही चोरी केली. महंमद कयाम, महंमद चांद, महंमद शाहनवाज, महंमद मोनू आणि महंमद सोनू अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी बिहारमधील एकाच गावात रहाणारे आहेत.