वंदनीय आणि आदरणीय अशा लालबहादूरांना कोटी कोटी प्रणाम !

श्री. दत्तात्रय पटवर्धन

शुभ दिवस असे आज २ ऑक्‍टोबर ।
जन्‍माला आले लालबहादूर ॥ १ ॥

भारताचे होते ते पंतप्रधान दुसरे ।
विश्‍वरत्न म्‍हणावे असे भारताचे भूषण खरे ॥ २ ॥

नीच, अधम शेजारी राष्‍ट्र नाव ज्‍याचे पाकिस्‍तान ।
केवळ दीड वर्षात उडवली पुरती त्‍याची दाणादाण ॥ ३ ॥

छत्रपती शिवरायांसम होती जणू वामन मूर्ती ।
अफझलखानाचा काढूनी कोथळा मिळवी दिगंत कीर्ती ॥ ४ ॥

वामन मूर्ती परि महान कीर्ती ।
म्‍हण सार्थ ही ठरवणार्‍या या भारत भूषण विभूती ॥ ५ ॥

भारतमातेच्‍या भालप्रदेशीचे तिलक हे असती ।
ज्‍यांच्‍या ठायी असते केवळ देव, देश, धर्म यांची भक्‍ती ॥ ६ ॥

वंदनीय आदरणीय अशा लालबहादूरांना ।
कोटी कोटी प्रणाम आमुचे त्‍यांच्‍या पुण्‍यस्‍मृतींना ॥ ७ ॥

– श्री. दत्तात्रय पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जिल्‍हा सिंधुदुर्ग.