भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो

ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्‍या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो.

गुरूंचे महत्त्व 

एखाद्यावर गुरूंनी कृपा केली, तर तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला सोडून देत नाहीत. त्यामुळे ज्याला गुरुप्राप्ती झाली, त्याला आयुष्यात सर्वकाही मिळाल्याप्रमाणेच आहे !

गुरुस्तवन पुष्पांजली

दासबोधातील सद्गुरुस्तवन आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

समष्टीला अध्यात्मातील ज्ञान मिळावे, याची तळमळ असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प.पू. डॉक्टरांना दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची तळमळ असणे आणि यातूनच समष्टीसाठी अमूल्य अशा ज्ञानभांडाराची निर्मिती होणे !

‘जी.पी.एस्.’च्या साहाय्याने ठाऊक नसलेल्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकणे, त्याचप्रमाणे गुरु किंवा मार्गदर्शक यांचे आज्ञापालन केल्यावर साधनेतील पुढचा टप्पा गाठता येणे

‘हल्लीच्या ‘इंटरनेट’ किंवा ‘टेक्नॉलॉजी’च्या युगात ‘जी.पी.एस्.’ (‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’, म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली) हा शब्द प्रत्येकालाच ठाऊक आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या अनोळखी भागात किंवा ठिकाणी जायचे असेल, तर आपण ‘जी.पी.एस्.’चा उपयोग करून ठाऊक नसलेल्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकतो.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली देशपांडे (वय १४ वर्षे) हिला श्रीविष्णूचा द्वापरयुगातील अवतार ‘श्रीकृष्ण’ आणि कलियुगातील अवतार ‘श्री जयंत’ यांच्यात जाणवलेले साम्य !

‘श्रीविष्णूचा द्वापरयुगातील अवतार श्रीकृष्ण आणि कलियुगातील अवतार ‘श्री जयंत’ यांच्यामध्ये असलेले साम्य गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या लक्षात आले. ते येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा पाहूनच तिचे आध्यात्मिक महत्त्व जाणणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !  

 ‘१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सप्तर्षींच्या आज्ञेने साधकांना श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले. त्या सोहळ्याची छायाचित्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण लिखाण २४ जुलै २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘गुरुभक्ती विशेषांका’त प्रसिद्ध करण्यात आले.

भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे

स्वतःला भक्त म्हणवणारे काही लोक दिवसातून एक घंटा देवाचे नाव घेतात आणि मग म्हणतात, ‘‘आता २३ घंटे कसेही वागले, तरी प्रत्यवाय (हरकत) नाही.’’ पतिव्रता असे म्हणू शकेल का की, मी केवळ एक घंटा पातिव्रत्य पाळणार आणि मग २३ घंटे कसेही वागणार ?

साधकाला दिलेला शब्द कालांतराने आठवणीने पाळणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘देव कधी विसरत नाही. योग्य वेळ आली की, तो शब्द पाळत असतो. त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे आवश्यक आहे.’

गुरुपदी असूनही स्वतःचे वेगळेपण जाणवू न देता साधकांमध्ये मिसळणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आरंभीपासूनच त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे कोणतेही अवडंबर न करता साधकांसमवेत साधकाप्रमाणेच राहून त्यांना घडवले. त्यांनीच स्थापन केलेल्या सनातनच्या आश्रमातही ते ‘मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे’, या भावानेच रहातात.