साधकाला दिलेला शब्द कालांतराने आठवणीने पाळणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. राम होनप

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैनंदिन कृतींचे, उदा. चालतांना, बोलतांना, जेवतांना इत्यादी, सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मिळाली. याचे सूक्ष्म परीक्षण झाल्यावर मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘एकदा तुम्ही साधकांशी बोलतांनाचे सूक्ष्म परीक्षण करावे का ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सध्या नको. पुढे पाहू.’’ त्यानंतर काही दिवसांनी माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर वरील विषय विसरले, तर नसतील ना ?’ त्यानंतर साधारण ३ वर्षांनी परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘सध्या सत्संग चालू आहेत. त्यांपैकी काही सत्संगाचे तू सूक्ष्म परीक्षण कर.’’ या प्रसंगानंतर माझ्या मनात विचार आला, ‘देव कधी विसरत नाही. योग्य वेळ आली की, तो शब्द पाळत असतो. त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे आवश्यक आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.