प्रत्येक जण शिक्षक, डॉक्टर, वकील वगैरे यांचे मार्गदर्शन घेतो, तर मग जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्ती देणार्या गुरूंचे महत्त्व किती असेल, याची कल्पनाही करता येत नाही. गुरु शिष्याच्या संकटांचे निवारण करतात, शिष्याला स्वयंप्रकाशी करतात. एखाद्यावर गुरूंनी कृपा केली, तर तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला सोडून देत नाहीत. त्यामुळे ज्याला गुरुप्राप्ती झाली, त्याला आयुष्यात सर्वकाही मिळाल्याप्रमाणेच आहे ! (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोगानुसार साधना’)