चोरे (सातारा) येथील वन विभागाच्‍या सीमेत गौण खनिजाचे उत्‍खनन !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १ मे (वार्ता.) – कराड तालुक्‍याच्‍या वनसीमेत अनधिकृतपणे गौण खनिजाचे उत्‍खनन करणार्‍या दोघांवर वन विभागाने कारवाई केली आहे. यामध्‍ये पोकलेन मशीन आणि डंपरसह वन विभागाने लाखो रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

कराड तालुक्‍यातील चोरे येथे वन विभागाच्‍या सीमेत पोकलेन यंत्राच्‍या साहाय्‍याने गौण खनिज उत्‍खनन चालू होते. ही माहिती वन विभागाचे साहाय्‍यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांना मिळाली. त्‍यांनी तातडीने वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वनसेवक यांचे पथक निर्माण करून घटनास्‍थळी पाठवले. या कारवाईत मध्‍यप्रदेश येथील मनोजसिंह आणि फलटण तालुक्‍यातील प्रफुल्ल जाधव यांना अटक करण्‍यात आली आहे.